¡Sorpréndeme!

या ' अभिनेत्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक | Indian Serial News | Lokmat News

2021-09-13 837 Dailymotion

देवो के देव.. महादेव’ या पौराणिक मालिकेत रामाची भूमिका साकारणारा अभिनेता पियुष सचदेव याला 23 वर्षीय फॅशन डिझायनरवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ‘बेहद’ मालिकेतही पियुषने काम केले होते.‘बॉम्बे टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी किरण काळे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘पियुष सचदेव याला कलम 376अंतर्गत बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आता तो तुरुंगात आहे’, असे काळे यांनी सांगितले. पियुषचे वडील कुलवीर सचदेव यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला याबद्दल काहीच कल्पना नसल्याचे त्यांनी म्हटले.‘बेहद’ मालिकेच्या क्रिएटिव्ह टीम मेम्बरसोबत असलेल्या प्रेमसंबंधांमुळेही पियुष चर्चेत आला होता. तसेच, हे दोघं लिव्ह इनमध्येही राहत होते. याच कारणामुळे पियुषची पत्नी त्याला सोडून गेल्याचे म्हटले जाते



आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews